दिवाळीचे संदेश [Diwali – Marathi Messages]

Send Marathi Diwali Greetings [messages or SMS] to your friends and relatives. You can send these Diwali/ Deepawali messages as Mobile SMS or Email. You can also copy the Diwali Message and paste in message box while sending a Marathi Diwali Greeting Card.

दिवाळीच्या सणासाठी आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी हे शुभसंदेश. दिवाळीचे शुभेच्छापत्र पाठवतानाही आपण यातील संदेश वापरता येईल. त्यासाठी हवा असणारा शुभसंदेश निवडुन तो “कॉपी” करा व दिवाळी शुभेच्छापत्र असणार्‍या पानावर जावुन संदेश रकान्यात तो “पेस्ट” करा.

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी

– गणेश भुते

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

– सकाळ पेपर्स वरुन

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

– सकाळ पेपर्स वरुन

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!

पहीला दिवा आज लागला दारी,
सुखाची किरणे येई घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली!

या संदर्भातील आणखी काही लेख:

 1. दिवाळी: फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 2. प्रेमाचे संदेश [Love – Marathi Messages]
 3. मकर संक्रांतीचे संदेश [Sankranti Marathi Messages]
 4. दिवाळी वॉलपेपर… [Diwali Marathi Wallpapers]
 5. व्हॅलेन्टाईन्स डे – प्रेमाचे संदेश [Valentines Day- Marathi Messages]
 6. शुभेच्छापत्रे – दिवाळी [Diwali – Marathi Greetings]
 7. गटारी अमावस्या संदेश
 8. वाढदिवसाचे संदेश [Birthday – Marathi Messages]
 9. गुढीपाडवा – संदेश [Gudi Padwa- Marathi Messages]
 10. विजयादशमी – दसरा शुभेच्छा संदेश
 11. भावपूर्ण श्रद्धांजली…!
 12. मैत्रीचे संदेश [Friendship Day – Marathi Messages – Quotes]
 13. बाळाचे आगमन संदेश [New Born Baby – Marathi Messages]
 14. पाऊस… आपल्या संगणकासाठी खास वॉलपेपर… [Rain Marathi Wallpapers]
 15. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो||
 16. मातृदिन शुभेच्छापत्रे [Mothers Day – Marathi Greetings]
 17. नवीन घर शुभेच्छापत्रे [New Home – Marathi Greetings]
 18. श्री ओम् वॉलपेपर [OM Marathi Wallpapers]
 19. मोबाईलसाठी वॉलपेपर्स
 20. श्री कॄष्णा वॉलपेपर [Krishna Wallpapers]
 21. जागतिक चिमणी दिन
 22. मराठी शुभेच्छापत्रे – ग्रिटींग – Marathi Greetings
 23. मराठी ग्रिटींगवर स्वागत!
 24. स्टार माझा – ब्लॉग माझा: विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
 25. यु आर माय पम्किन पम्किन.. हॅलो हनी – बनी..
 26. रंगपंचमी – संदेश [Rangapanchami- Marathi Messages]
 27. दहावीचा निकाल लागला – सर्व यशस्वी विद्यार्थी मित्रांचे हार्दिक अभिनंदन!
 28. मराठी ग्रिटींग्ज वरुन आता मोफत एसएमएस सुद्धा पाठवा!
 29. भारतीय स्वातंत्र्यदिन शुभेच्छापत्रे [Indian Independence Day Greetings]
 30. कोजागरी पौर्णिमा शुभेच्छापत्रे [Kojagari – Paurnima Marathi Greetings]