Marathi Greetings » शुभेच्छापत्रे » गुढीपाडवा » » गुढीपाडवा – शुभेच्छापत्रे [Gudi Padwa - Marathi Greetings]

गुढीपाडवा – शुभेच्छापत्रे [Gudi Padwa - Marathi Greetings]

प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालीवाहन राजाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो. गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते व नंतर गुढी पाटावर उभी केली जाते.
- विकि

गुढीपाडवा शुभेच्छापत्र पाठवताना सोबत नवीन गुढीपाडवा संदेश लिहिण्यासाठी गुढीपाडवा संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.


आवडलं? शेअर करा ना मग!

 

मराठी ग्रिटींग्ज फेसबुक वर

नमस्कार! कृपया प्रवेश करा

ई-मेल – फीडबर्नर वर्गणीदार व्हा!

फीडबर्नवर नोंदणी केल्यास नवीन लेखन, मराठी शुभेच्छापत्रे [मराठी ग्रिटींग], वॉलपेपर्स, मराठी संदेश इ. बद्दल आपणांस लागलीच ई-पत्र पाठवले जाते.
आपला ई-पत्ता:
फीडबर्नरची सेवा

मराठी दिनदर्शिका

दप्तर

2012; 2011; 2010;

शुभेच्छापत्रे - वॉलपेपर्स - संदेश

डो. आंबेडकर जयंती, दसरा, दसरा शुभ संदेश, दिवाळी, दिवाळी संदेश, नाताळ, नाताळ, नाताळ, नाताळ, नाती, नवरात्र, नवरात्र संदेश, नववर्ष शुभेच्छापत्र, नवीन वर्ष, नवीन वर्ष मराठी वॉलपेपर, नवीन वर्ष संदेश, नोव्हेंबर, प्रासंगिक, प्रासंगिक, प्रेम, प्रेम संदेश, प्रेमिका, प्रेमी, फेसबुक, बायको, बाळाचे आगमन, बाळाचे आगमन संदेश, ब्लॉग, ब्लॉगर, भक्तीगीत, मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिवस संदेश, महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन, माफी संदेश, मकर संक्रांत संदेश, मैत्री, मैत्रीचे संदेश, मोबाईल मराठी वॉलपेपर, राम नवमी, रिंगटोन-पाऊस, रिंगटोन्स, रंगपंचमी, रंगपंचमी संदेश, रक्षाबंधन, शिक्षक दिन, शुभेच्छापत्रे, सण, सण, सण, संदेश, संस्कृत वॉलपेपर्स, संक्रांत, स्वातंत्र्य दिन, हनुमान जयंती, हेडर ग्राफिक्स, होळी, ईद, वर्डप्रेस, वर्ष-२०१०, वाढदिवस, वाढदिवस संदेश, व्हॅलेन्टाईन्स डे, वॉलपेपर, गटारी, गणराज्य दिन, गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे, गणेश चतुर्थी संदेश, गुढीपाडवा, गुढीपाडवा, ग्राफिक्स, ऑक्टोंबर, आई, आंतरराष्ट्रीय महिला दिन, क्षमापत्र, अभिनंदन, अक्षय तृतीया,