मदत

नोंदणी कशासाठी?
आपण नोंदणीशिवायही ग्रिटींग कार्ड पाठवू शकता. मात्र नोंदणी केल्यास, कार्ड पाठविताना आपले नाव, ई-पत्ता हे आपोआप भरले जाते. आपण नोंदणी केलेल्या ई-पत्त्यावरुन आपले शुभेच्छापत्र पाठवण्यात येते, जेणेकरुन ते पत्र मिळणार्‍याला ते आपणांकडुन आल्याची खात्री होईल. नोंदणीशिवाय ही सोय दिल्यास “स्पॅमर्स” किंवा काही लोक बनावट वा चूकीचा/ दुसर्‍याचा ई-पत्ता देवुन शुभेच्छापत्र पाठवु शकतात. हे थांबवण्यासाठीच या संकेतथळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
ता.क. – नोंदणी करण्यास फक्त १ मिनिटाचा वेळ लागतो आणि आम्ही तुमच्या ई-पत्त्यावर स्पॅम करणार नाही याची पुर्ण शाश्वतीही देतो. मग, पटकन नोंदणी करा!

फीडबर्नर वर्गणीदार कशासाठी?
फीडबर्नर ही गुगलची एक सुविधा आहे. याद्वारे संकेतस्थळावरील नवीन लेख प्रकाशित झाल्याबरोबर आपणांस ई-मेल द्वारा कळवण्यात येते. अशाप्रकारे आपण या संकेतस्थळावरील नवीन लेख, शुभेच्छापत्रे, वॉलपेपर्स अथवा ग्राफिक्स यांची लागलीच माहिती मिळवु शकता.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी उजव्या बाजुला असणार्‍या “फीडबर्नर वर्गणीदार व्हा” या सदराखालील रकान्यात आपल्या ई-मेल पत्ता द्या. त्यानंतर आपणांस सदर सेवेबद्दलची एक ई-मेल पाठवण्यात येते. ती मान्य केल्यास नवीन लेखनाबद्दल आपणांस कळवण्यास सुरुवात होते.

मी माझ्या ब्लॉग/ संकेतस्थळावर येथील ग्राफिक्स वापरु शकतो का?
हो! अगदी बिंधास्त! मात्र संबधित ग्राफिक्सवर असणारा “मराठीग्रिटींग्ज.नेट” चा लोगो/ चिन्ह यामध्ये फेरफार/ बदल/ अथवा ते न काढता आपण हे सारे ग्राफिक्स वापरु शकता. शिवाय आपण “मराठीग्रिटींग्ज.नेट” ला खाली दाखवल्याप्रमाने दुवा द्या.

<a href=”http://goo.gl/2Vv0″ target=”_blank”> मराठीग्रिटींग्ज.नेट </a>

मराठीग्रिटींग्ज.नेट ची शुभेच्छापत्रे काही संकेतस्थळावर / ब्लॉगवर पाहण्यात आली. आपणांस आमचा हा प्रयत्न आवडल्याचं पाहुन आनंद झाला. मात्र त्यावरील “मराठीग्रिटींग्ज.नेट” लोगो काढुन किंवा “मराठीग्रिटींग्ज.नेट” ला दुवा न देता / उल्लेख न करता, ते वापरण्यात आल्याचे पाहिले. संबंधितांना तसे कळवण्यात आले आहे. आपणांसही असे आढळल्यास आम्हाला कळवा किंवा त्या संकेतस्थळावर आपण तसे नोंद करुन सहकार्य करा.

मी माझ्या ब्लॉग/ संकेतस्थळावर “मराठीग्रिटींग्ज.नेट” चा लोगो लावु शकतो का व कसा?
marathi Greetings! “मराठीग्रिटींग्ज.नेट” सध्या प्राथमिक अवस्थेत आहे व त्यास प्रचार व प्रसाराची गरज आहे. आपण “मराठीग्रिटींग्ज.नेट” चा प्रसार करण्यात आमची मदत करण्यास उत्सुक आहात, यातच आमचे भाग्य! “मराठीग्रिटींग्ज.नेट” चा लोगो आपण आपल्या ब्लॉग वा संकेतस्थळावर लावु शकता. त्यासाठी खाली दिलेला कोड आपल्या ब्लॉगच्या विजेट मध्ये कॉपी-पेस्ट करा.

<a href=”http://www.MarathiGreetings.net” target=”_blank”><img alt=”Marathi Greetings!” src=”http://goo.gl/7o7xJ”></a>

ब्लॉगर / ब्लॉगस्पॉटचे मित्र खाली दिलेल्या बटनावर टिक् करुन “मराठीग्रिटींग्ज” चे विजेट आपल्या ब्लॉगवर लावू शकतात. 

माझ्या काही कविता/ चारोळ्या मला “मराठीग्रिटींग्ज.नेट” वर देता येतील का?
हो, आम्हाला संबंधिक लेखन “संपर्क” या पानांवरुन पाठवू शकता.

या संकेतस्थळावरील सर्व लेखांचा आराखडा मिळेल का?
हो! त्यासाठी वाटाड्या या पानावर जा. आतापर्यतचे सर्व प्रकाशित लेख आपणांस सापडतील.

मला आणखी माहिती हवी आहे.
विचारा ना मग! “संपर्क” या पानांवरुन आपण आपले प्रश्न/ प्रतिक्रिया आम्हांस पाठवू शकता. आम्ही लवकरांत लवकर आपणांसा उत्तर देवू.