जागतिक महिला दिन

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही काही घरांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. – विकि

जागतिक महिला दिन [marathi-greetings]

जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू
जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू

नको रडू..’स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ म्हणत तू
शोध घे स्वत:चा ,एक नवीन कहाणी लिही तू

घर आणि करिअर,तारेवरची कसरत करतेय तू
२१ व्या शतकातली सुपरवुमन तू

रक्षण,आरक्षण हे आक्रोश सोड तू
कर्म करत रहा,’फळाला’ पात्र होशील तू

भगिनी भाव जरुर पाळ तू
कणखर हो,स्वत:ची मदत स्वत: हो तू

विधात्याची नवनिर्माणाची कलाकृति तू
एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू

उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद..ऐक तू
‘स्त्री’ म्हणून जन्मलीयेस,’व्यक्ती’ म्हणूनही जग तू

— स्वप्ना

या संदर्भातील आणखी काही लेख:

 1. भावपूर्ण श्रद्धांजली…!
 2. अक्षय्य तृतीया
 3. मराठी-ग्रिटींग तर्फे आपणांस नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
 4. जागतिक चिमणी दिन
 5. मातृदिन शुभेच्छापत्रे [Mothers Day – Marathi Greetings]
 6. नवीन घर शुभेच्छापत्रे [New Home – Marathi Greetings]
 7. पाऊस… आपल्या संगणकासाठी खास वॉलपेपर… [Rain Marathi Wallpapers]
 8. मोबाईलसाठी वॉलपेपर्स
 9. आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो||
 10. श्री ओम् वॉलपेपर [OM Marathi Wallpapers]
 11. दिवाळी वॉलपेपर… [Diwali Marathi Wallpapers]
 12. श्री कॄष्णा वॉलपेपर [Krishna Wallpapers]
 13. दिवाळी: फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 14. मराठी ग्रिटींग्ज वरुन आता मोफत एसएमएस सुद्धा पाठवा!
 15. मराठीग्रिटींग्ज वरील नवीन सोयी
 16. यु आर माय पम्किन पम्किन.. हॅलो हनी – बनी..
 17. फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 18. फेसबुक टाईमलाईन ग्राफिक्स
 19. शुभेच्छापत्रे – बालदिवस [Children’s Day – Marathi Greetings]
 20. होळी पौर्णिमा
 21. जागतिक मराठी भाषा दिवस
 22. स्टार माझा – ब्लॉग माझा: विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
 23. दहावीचा निकाल लागला – सर्व यशस्वी विद्यार्थी मित्रांचे हार्दिक अभिनंदन!
 24. गुरुपौर्णिमा
 25. मकर संक्रांतीचे संदेश [Sankranti Marathi Messages]
 26. व्हॅलेन्टाईन्स डे – प्रेमाचे संदेश [Valentines Day- Marathi Messages]
 27. गुढीपाडवा – संदेश [Gudi Padwa- Marathi Messages]
 28. शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली
 29. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 30. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।