Category Archives: सण

मराठी सणांची शुभेच्छापत्रे – मराठी सण [Marathi Festival Marathi Greetings]

शुभेच्छापत्रे – दिवाळी [Diwali – Marathi Greetings]

दिवाळी हा सण भारतात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. आपल्याकडे दिवाळीत जसे गोडधोड पदार्थ बनवण्याची पद्धत आहे तसे इतर प्रांतातही काही विशेष पदार्थ बनवले जातात. फटाके तर देशाच्या कानाकोपऱ्यात वाजवले जातात, दिव्यांचा सण असल्यामुळे देशभरात सर्वच घरात व घराबाहेर दिवे लावले जातात, रांगोळी काढली जाते. तरीही मराठी माणसांच्या दिवाळीचे काही खास वैशिष्ट्ये आहेत. – म.टा. [ दिवाळी शुभेच्छापत्रे पान -१, दिवाळी शुभेच्छापत्रे पान: २, दिवाळी शुभेच्छापत्रे पान: ३ ]

Deepawali (also spelled Divali in other countries) or Diwali is popularly known as the festival of lights. It is an important five-day festival, occurring between mid-October and mid-November. For most Hindus and Indians, Diwali is the most important festival of the year and is celebrated with families performing traditional activities together in their homes. – Wiki

शुभेच्छापत्र पाठवताना सोबत शुभ संदेश लिहिण्यासाठी दिवाळीचे संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.

विजयादशमी – दसरा शुभेच्छापत्रे [Vijayadashami Dasara Greetings]

आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसर्‍याला `दशहरा’ असे म्हणतात. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात व शक्‍तीने भारलेल्या असतात. आसुरी शक्‍तींवर दैवी शक्‍तींनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस; म्हणून या दिवसाला `विजयादशमी’ असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात.
शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व : दसर्‍याला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. दसर्‍याला रामतत्त्वमारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते.
२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते.
३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचतत्त्वे आहेत.)
४. शमीकडून प्रक्षेपित होणार्‍या तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात.
५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात, तेव्हा तेजलहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो.

विजयादशमी – दसरा शुभेच्छापत्र पाठवताना सोबत विजयादशमी – दसरा शुभेच्छा संदेश लिहिण्यासाठी विजयादशमी – दसरा शुभेच्छा संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.

शुभेच्छापत्रे – नवरात्र [Navratri – Marathi Greetings]

हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत श्री दुर्गादेवीचे तत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत सर्वाधिक प्रमाणात कार्यरत असते. त्याचा लाभ मिळावा यासाठी, पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी महाकालीची, दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढविण्यासाठी सत्त्वगुणी महालक्ष्मीची व शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी रजोगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

Navratri, Navaratri, or Navarathri is a Hindu festival of worship of Shakti and dance & festivities. The word Navaratri literally means nine nights in Sanskrit, nava meaning nine and ratri meaning nights. During these nine nights and ten days, nine forms of Shakti/Devi are worshiped. – Wiki

नवरात्र शुभेच्छापत्र पाठवताना सोबत नवरात्र संदेश लिहिण्यासाठी नवरात्र शुभेच्छा संदेश असणार्‍या पानावरुन आपला संदेश कॉपी करा.