Category Archives: प्रासंगिक

प्रासंगिक शुभेच्छापत्रे

नवीन घर शुभेच्छापत्रे [New Home – Marathi Greetings]

घर.. एक स्वप्नपूर्ती! आपलं एक छोटसं घर असावं अशी प्रत्येकाची मनोकामना असते. ती पुर्ण झाल्याचा आनंद अवर्णनीयच. चला त्यांच्या आनंदात सहभागी होऊ, त्यांना शुभेच्छा देऊन!

आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो||

ऋतू आंब्याचा – फळांचा राजा आंबा. अशा हंगामात आपल्याला हे बालगीत नक्कीच आठवत असेल!

आंबा पिकतो, रस गळतो,
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो ॥धृ॥

निळ्या आभाळी सांज सकाळी
जगताचा राजा रवी रंग फेकतो ॥१॥

पाऊस वेळी ढगांच्या ओळी
थुई थुई पक्षीराजा मोर नाचतो ॥२॥

आंब्याच्या वनी पानी लपुनी
उंच सुरांनी कोकिळ कुहूऽ बोलतो ॥३॥

पायी पैंजण हाती टिपरी
कुंजवनी बाळराजा कृष्ण खेळतो ॥४॥