Category Archives: संदेश

आपल्या मोबाईल वरुन एसएमएस, ई-मेल द्वारा किंवा मराठी ग्रिटींगसोबत पाठवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश.

विजयादशमी – दसरा शुभेच्छा संदेश

दसरा सणाची शुभेच्छापत्रे पाहिलीत का?

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचाऱ्यांचे सोने!”
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी,
दस-याच्या आज शुभ दिनी,
सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी ..!

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!

पुन्हा एक नवी पहाट,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!

माफ करा [Marathi Sorry Quotes – Sorry Messages]

ये सायबा,
आपुन चुकलो रे.. एक डाव माफी कर!

अजानतेपणी मी आपल्याला दुखावलं. मी माझी चुक मान्य करतो.
आपण माझी चुक माफ कराल हीच अपेक्षा!

चुकलो मी… आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का?
… चल .. मी तुझी जाहीर माफी मागतो.. आता तरी बोल!

खरं सांगायचं तर, माझंच चुकलं! मी माझी चुक मान्य करतो.
मला माफ कराल ना?

अहो, मी पण माणुसच आहे – चुकतो कधी – कधी!
तुम्ही मोठेपण दाखवुन मला माफ करा ना!

मी मोठ्ठा गाढवपणा केला, मान्य करतो!
माफी असावी!

हात् तिच्या! बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो!
आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस. किमान हे वाचुन तरी मला माफ कर!

झालं गेलं गंगेला मिळालं, आमचं घोडं गंगेत नहालं!
खरं सांगायचं तर, माझंच चुकलं! मला माफ कराल ना?

अगदी “सॉरी शक्तिमान” ही म्हणालो… आता तरी माफ कर!

श्री गणपती मराठी शुभेच्छा संदेश – आरती – स्त्रोत्र [Ganapati Messages]

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

ओम नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥
देवा तुचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजोजी ॥

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ॥
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ॥

॥ सुखकर्ता दु:खहर्ता ॥

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१ ॥
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ||ध्रु.||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥२ ॥
लंबोदर पीतांबर फणिवरवंदना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३ ॥

देवेन्द्रमौलिमन्दारमकरन्दकणारुणाः ।
विघ्नं हरन्तु हेरम्वचरणाम्बुजरेणबः ॥

एकदंन्तं महाकायं लम्बोदरं गजाननं ।
विघ्ननाशकरं देवम् हेरम्बं प्रणमाम्यहम् ॥