Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
नवरात्र संदेश आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी हे नवरात्र संदेश.
वर्गः: नवरात्र, संदेश, Marathi Messages, Navratra marathi message, Navratri
नवरात्र सणाची शुभेच्छापत्रे पाहिलीत का?
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्रयम्बके गौरी नारायणी नमोस्तुते !!
दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांतें वारी
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करता पडले प्रवाही
ते तू भक्तांलागी पावसि लवलाही॥२॥जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥प्रसन्नवदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशापासुन सोडी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा॥३॥जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
उदो बोला उदो, अंबाबाई माऊलीचा हो ।
उदो कारे गर्जती, काय महिमा वर्णू तिचा हो ।
उदो बोला उदो ॥ धृ॥अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो ।
मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी हो । ब्रम्हा विष्णू रूद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥
उदो बोला उदो ….॥धृ॥द्वितीयेचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो । उदो कारे गर्जती, सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥
उदो बोला उदो……. ॥ धृ ॥तृतीयेचे दिवशी, अंबे श्रृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे, पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती, अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३॥
उदो बोला उदो ……. ॥धृ॥चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो,। उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो ।
पूर्णकृपे तारिसी, जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो ।।४॥
उदो बोला उदो अंबाबाई…… ॥धृ॥पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो । अर्घ्य पाद्य पूजने, तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी, करिती जागरण, हरिकथा हो । आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।।५॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो । घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता, देसी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।६॥
उदो बोला उदो…… ॥धृ॥सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाई जुई शेवंती, पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता, झेलूनी घेसी वरचे वरी हो ।।७॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो । सह्य्राद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो ।
मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो । स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो ।।८॥
उदो बोला उदो …….॥धृ॥नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो । सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी, अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा, तृप्त केले कृपेकरुनी हो ।।९॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो । सिंहारूढ करी दारुण, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शुंभ निशुंभादिक राक्षसा, किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा, आश्रय दिधला तव चरणी हो ।।१०॥
उदो बोला उदो……. ॥धृ॥
नाकीचा निर्मळ मोती | मळवट भाळी रेखिती ||
महाळुंग उजव्या हाती | शिवलिंग मस्तकावरी ||
आई अंबाबाईचा उदे उदे!!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
आई अंबाबाई | फुले तुला सुवासाची |
काळजी कुंकवाची | माझ्या घेई ||
आई अंबाबाईचा उदे उदे!!
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही,
चारी श्रमले परंतु न बोलवे काही |
आई उदे गं अंबाबाई |
उदो बोला उदो, अंबाबाई माऊलीचा हो ।
उदो कारे गर्जती, काय महिमा वर्णू तिचा हो ।
उदो बोला उदो ॥
डो. आंबेडकर जयंती, दसरा, दसरा शुभ संदेश, दिवाळी, दिवाळी संदेश, नाताळ, नाताळ, नाताळ, नाताळ, नाती, नवरात्र, नवरात्र संदेश, नववर्ष शुभेच्छापत्र, नवीन घर, नवीन वर्ष, नवीन वर्ष मराठी वॉलपेपर, नवीन वर्ष संदेश, नोव्हेंबर, प्रासंगिक, प्रासंगिक, प्रेम, प्रेम संदेश, प्रेमिका, प्रेमी, फेसबुक, बायको, बाळाचे आगमन, बाळाचे आगमन संदेश, ब्लॉग, ब्लॉगर, भक्तीगीत, मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिवस संदेश, महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन, माफी संदेश, मकर संक्रांत संदेश, मैत्री, मैत्रीचे संदेश, मोबाईल मराठी वॉलपेपर, राम नवमी, रिंगटोन-पाऊस, रिंगटोन्स, रंगपंचमी, रंगपंचमी संदेश, रक्षाबंधन, शिक्षक दिन, शुभेच्छापत्रे, सण, सण, सण, संदेश, संस्कृत वॉलपेपर्स, संक्रांत, स्वातंत्र्य दिन, हनुमान जयंती, हेडर ग्राफिक्स, होळी, ईद, वर्डप्रेस, वर्ष-२०१०, वाढदिवस, वाढदिवस संदेश, व्हॅलेन्टाईन्स डे, वॉलपेपर, गटारी, गणराज्य दिन, गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे, गणेश चतुर्थी संदेश, गुढीपाडवा, गुढीपाडवा, ग्राफिक्स, ऑक्टोंबर, आई, आंतरराष्ट्रीय महिला दिन, क्षमापत्र, अभिनंदन, अक्षय तृतीया,