Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

व्हॅलेन्टाईन्स डे

व्हॅलेन्टाईन्स डे – प्रेमाचे संदेश [Valentines Day- Marathi Messages]

व्हॅलेन्टाईन्स डे – प्रेमाचे संदेश [Valentines Day- Marathi Messages]

वर्गः: , , , , , , , ,

व्हॅलेन्टाईन्स डे संदेश आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी हे व्हॅलेन्टाईन्स डे चे संदेश. व्हॅलेन्टाईन्स डे शुभेच्छापत्र पाठवतानाही आपण यातील संदेश वापरता येईल. त्यासाठी हवा असणारा प्रेम संदेश निवडुन तो “कॉपी” करा व व्हॅलेन्टाईन्स डे शुभेच्छापत्र असणार्‍या पानावर जावुन संदेश रकान्यात तो “पेस्ट” करा.

आता पुरे झालं रे तुझं
असं मला शब्दांनी छ्ळणं.
सलत नाही का तुला कधी
माझं तुझ्यासाठी निरंतर जळणं.

रात्र अशी बहरुन जाते
चांदण्यांचा सडा शिंपताना
स्वप्नातली तू आठवतेस; पहाटे
अंगणातला पारिजात वेचताना.

तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.

एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या
आणि घे डोळे मिटुन
बघ कळतयं का तुला की,
तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन !

नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!

रात्री चंद्र असा सजला होता
तार्‍यांनी चिंब भिजला होता
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिच्यार्‍याचा चेहरा पडला होता.

तु नसतेस तेव्हा,
चांदण्याही काळोखात
हरवलेल्या असतात.
चंद्राचं वेड नाही मला,
फक्त तु असावी शेजारी
जेव्हा तारे वाट चुकतात.

घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो!

पडता कानी तुझ्या बासरीचे सुर
हरपला जीव, धडधडला उर
का भासे मज तु कोसों दुर
वाहशी जरी होउनी डोळ्यांतला पुर !

एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेउन मिरवतो.
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो.

दिवा दिसताच प्रकाश मागणे
पक्षी दिसताच आकाश मागणे
हा स्वभाव बरा नाही!
ज्योती जळतात माझ्याचसाठी
पक्षी उडतात माझ्याचसाठी
हा समज खरा नाही!

रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!

तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…

या सर्व कविता श्री. दीपक परुळेकर यांच्या आहेत. त्यांच्या पुर्व-परवानगीचे मराठी जनतेसाठी प्रकाशित.



 

Write Us
Google Plus
Subcribe to Marathi Greetings RSS Feed