Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
आपल्या मोबाईल वरुन एसएमएस, ई-मेल द्वारा किंवा मराठी ग्रिटींगसोबत पाठवण्यासाठी हे शुभेच्छा संदेश.
वर्गः: प्रेम संदेश, प्रेमाचे संदेश, प्रेमिका, प्रेमी, व्हॅलेन्टाईन्स डे, love message, love sms, marathi love message, Valentines Day
व्हॅलेन्टाईन्स डे संदेश आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी हे व्हॅलेन्टाईन्स डे चे संदेश. व्हॅलेन्टाईन्स डे शुभेच्छापत्र पाठवतानाही आपण यातील संदेश वापरता येईल. त्यासाठी हवा असणारा प्रेम संदेश निवडुन तो “कॉपी” करा व व्हॅलेन्टाईन्स डे शुभेच्छापत्र असणार्या पानावर जावुन संदेश रकान्यात तो “पेस्ट” करा.
आता पुरे झालं रे तुझं
असं मला शब्दांनी छ्ळणं.
सलत नाही का तुला कधी
माझं तुझ्यासाठी निरंतर जळणं.
रात्र अशी बहरुन जाते
चांदण्यांचा सडा शिंपताना
स्वप्नातली तू आठवतेस; पहाटे
अंगणातला पारिजात वेचताना.
तुझी वाट बघून थकलेल्या,
डोळ्यांना आता निजवतो आहे.
तुझ्या माझ्या भेटीसाठी,
स्वप्नांचा गाव सजवतो आहे.
एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या
आणि घे डोळे मिटुन
बघ कळतयं का तुला की,
तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन !
नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!
रात्री चंद्र असा सजला होता
तार्यांनी चिंब भिजला होता
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिच्यार्याचा चेहरा पडला होता.
तु नसतेस तेव्हा,
चांदण्याही काळोखात
हरवलेल्या असतात.
चंद्राचं वेड नाही मला,
फक्त तु असावी शेजारी
जेव्हा तारे वाट चुकतात.
घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो!
पडता कानी तुझ्या बासरीचे सुर
हरपला जीव, धडधडला उर
का भासे मज तु कोसों दुर
वाहशी जरी होउनी डोळ्यांतला पुर !
एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेउन मिरवतो.
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो.
दिवा दिसताच प्रकाश मागणे
पक्षी दिसताच आकाश मागणे
हा स्वभाव बरा नाही!
ज्योती जळतात माझ्याचसाठी
पक्षी उडतात माझ्याचसाठी
हा समज खरा नाही!
रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्यांनी!
तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मीपण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…
या सर्व कविता श्री. दीपक परुळेकर यांच्या आहेत. त्यांच्या पुर्व-परवानगीचे मराठी जनतेसाठी प्रकाशित.
वर्गः: बाळाचे आगमन संदेश
बाळाचे आगमन शुभेच्छापत्रे [New Born Baby - Marathi Greetings]
आगमन नव्या बाळाचे
अभिनंदन आई-वडिलांचे..!
नवजात बाळास अनेक शुभ-आशिर्वाद व शुभेच्छा!!
इवल्याशा पणतीने सारे घर प्रकाशित केले,
इवल्याशा बाळाने सारे घर आनंदित केले..!
आम्ही सारे आपल्या आनंदात सहभागी आहोत.
नवजात बाळास अनेक शुभ-आशिर्वाद व शुभेच्छा!!
ओठावर हसु, गालावर खळी,
संसार वृक्षाच्या वेलीवर, उमलली कळी…!
आम्ही सारे आपल्या आनंदात सहभागी आहोत.
नवजात बाळास अनेक शुभ-आशिर्वाद व शुभेच्छा!!
पहिली बेटी – धनाची पेटी!
कन्यारत्नासह धनसंपन्न आई-वडिलांचे अभिनंदन!
नवजात बाळास अनेक शुभ-आशिर्वाद व शुभेच्छा!!
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकीं झेंडा..
पुत्ररत्नासह धनसंपन्न आई-वडिलांचे अभिनंदन!
नवजात बाळास अनेक शुभ-आशिर्वाद व शुभेच्छा!!
वर्गः: मकर संक्रांत, मकर संक्रांती
आठवण सुर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मणभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
ऋणानुबंध वाढवा….!
तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला.
खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तीळ आणि गुळासारखी रहावी,
आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
नात्यातील कटुता इथेच संपवा….
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला…!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
झाले – गेले विसरुन जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
मनात असते आपुलकी,
म्हणुन स्वर होतो ओला..
हलवा – तिळगुळ घ्या अन्
गोड गोड बोला…!
मांजा, चक्री…
पतंगाची काटाकाटी…
हलवा, तिळगुळ, गुळपोळी…
संक्रांतीची लज्ज्त न्यारी…
पतंग उडवायला चला रे….!!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शुभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!
डो. आंबेडकर जयंती, दसरा, दसरा शुभ संदेश, दिवाळी, दिवाळी संदेश, नाताळ, नाताळ, नाताळ, नाताळ, नाती, नवरात्र, नवरात्र संदेश, नववर्ष शुभेच्छापत्र, नवीन घर, नवीन वर्ष, नवीन वर्ष मराठी वॉलपेपर, नवीन वर्ष संदेश, नोव्हेंबर, प्रासंगिक, प्रासंगिक, प्रेम, प्रेम संदेश, प्रेमिका, प्रेमी, फेसबुक, बायको, बाळाचे आगमन, बाळाचे आगमन संदेश, ब्लॉग, ब्लॉगर, भक्तीगीत, मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिवस संदेश, महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन, माफी संदेश, मकर संक्रांत संदेश, मैत्री, मैत्रीचे संदेश, मोबाईल मराठी वॉलपेपर, राम नवमी, रिंगटोन-पाऊस, रिंगटोन्स, रंगपंचमी, रंगपंचमी संदेश, रक्षाबंधन, शिक्षक दिन, शुभेच्छापत्रे, सण, सण, सण, संदेश, संस्कृत वॉलपेपर्स, संक्रांत, स्वातंत्र्य दिन, हनुमान जयंती, हेडर ग्राफिक्स, होळी, ईद, वर्डप्रेस, वर्ष-२०१०, वाढदिवस, वाढदिवस संदेश, व्हॅलेन्टाईन्स डे, वॉलपेपर, गटारी, गणराज्य दिन, गणेश चतुर्थी शुभेच्छापत्रे, गणेश चतुर्थी संदेश, गुढीपाडवा, गुढीपाडवा, ग्राफिक्स, ऑक्टोंबर, आई, आंतरराष्ट्रीय महिला दिन, क्षमापत्र, अभिनंदन, अक्षय तृतीया,