मराठी संदेश: विचारधन
विचारधन, अवतरणे, अनुभव आणि अनुभूती यांचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

विचारधन

नशीब

नशिबाच्या सगळ्याच सोंगट्या आपल्या मनाप्रमाणं पडतीलच असं नाही, पण जशा पडतील तशाही परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच.

विचारधन

नशीब

नशिबाशी लढायला मजा येत आहे मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही आणि मी हार मानत नाही!

विचारधन

जग कसं अजब आहे !

देवावर प्रेम सर्वांनाच आहे. पण "त्याच्या घरी" जायची घाई मात्र कुणालाच नाही. आपल्या घरात सर्वांनाच देव हवा. पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.

देव आपल्या ... ...अजून पुढं आहे →

विचारधन

आनंद

आनंदी आणि समाधानी होण्यासाठी श्रीमंत होण्याची प्रतीक्षा करू नका. आनंद विनामूल्य आहे!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०