मराठी संदेश: टोचण!
खास लोकांसाठी खास मराठी शैलीत टोचण!

वाचलास...
टोचण!
"सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला, पण मी तो पडु दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो "वाचला".
बायको म्हणाली "वाचला" नाही.. "वाचलास".....!"
प्लॅन...
टोचण!
गोव्याच्या लोकांचं एक बरं असतं......
.....
प्लॅन कॅन्सल झाला तरी गोव्यातच असतात!
लपवा छपवी
टोचण!
स्त्री फक्त वय लपवते! पुरुषांना मात्र ढेरी, टक्कल, पांढरे केस, पगार आणि मोबाईल असं बरंच काही लपवावं लागतं !
बाबा लगीन...
टोचण!
माझ्या मित्राचं लग्न जमत नव्हतं, मग मी त्याचे भांडी घासतानाचे फोटो मॅट्रिमोनि साईटवर टाकले... आता स्थळांचा नुसता पूर आलाय!
अध्यात्म...
टोचण!
आज सकाळी सकाळी थोडासा अध्यात्मिक झालो… आणि… डोळे बंद करून विचार करू लागलो…
कोण आहे मी?
कुठून आलोय?
कशासाठी आलोय या जगात?
काय ध्येय असावं या जीवनाचं?
...
....
तेवढ्यात… ... ...अजून पुढं आहे →
स्टेटस
टोचण!
दुःखी असतानाही सुखी.. आणि सगळं सुखासुखी असताना दुःखी दाखविण्याचं हक्काचं आणि एकमेव ठिकाण म्हणजे व्हॉट्सॲप स्टेटस होय! आजचं काय?

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२१