मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ

कसं करावं?

गप्प राहीलं की गैरसमज होतात आणि बोललं की वाद!
कसं करावं?

हसा ओ

कव्हर

बाबा, तुम्ही शाळेत असताना, वह्यापुस्तकाला खाकी कव्हर घालत होतात की प्लास्टीकचं?

अरे आम्ही वर्तमानपत्राची रद्दी वापरायचो; वह्यापुस्तकाला कव्हर म्हणून. कसलं खाकी, कसलं प्लास्टीक अन् कसली स्टीकर्स!

पण, स्टीकर्सशिवाय ... ...अजून पुढं आहे →

हसा ओ

गुरू दक्षिणा

आज बायकोने किचन मध्ये स्पेशल "खीर" बनवायला शिकवली.
मी म्हटलं, आता "गुरू दक्षिणा" माग!
बायको म्हणाली: शेजारणीला माझ्यासमाेर "ताई" म्हणा!

हसा ओ

अभ्यास

मी सोनूला विचारलं आज होमवर्क काय आलायं?
तर ती म्हणाली मला नाही आला, मी मॅडमला ब्लॉक केलंय!
#ऑनलाइन_शिक्षण

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०