मराठी संदेश: हसा ओ
हसण्यासाठी जन्म आपुला! हसा, हसवत रहा! हसरे किस्से सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

हसा ओ
शोध

आज मी एक नवीन शोध लावला.
आता किती ही वेळ बाल्कनीत कावळा ओरडला,
तरी कोणीही पाहुणा येत नाही!

हसा ओ
सावधान

सगळे मास्तर लोक सावधान..
बाहेर फीरु नका..
काय माहीत तुम्ही हानलेला ऐखादा
विद्यार्थी पोलीस बनुन तुमची वाट
पाहत असेल..!

हसा ओ
फुल...

सासु जावयाला रोज फोन करून विचारते: माझे फुल काय करतेय?
एका दिवशी जावयाने कंटाळून सांगितलेच...
.....
आता सत्तर किलोचा फ्लॉवर झाला आहे!
किती दिवस माझे फुल.. माझे फुल करणार...?