मराठी संदेश: आयुष्य हे!
आयुष्य हे! अनुभव, अनुभूती आणि सुविचार सांगणारे मराठी संदेश आणि मराठी / शुभेच्छापत्रे

आयुष्य हे!
येणारा क्षण

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे... तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे!

आयुष्य हे!
सुख आणि वय

सुख आणि वय या दोघांचे कधीच पटले नाही. कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेले.

आयुष्य हे!
नियती

नियत कितीही चांगली असुद्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरुन आपली किंमत ठरवत असते. मात्र आपला दिखावा कितीही चांगला असुद्या, नियती आपली नियत ओळखुनच आपल्याला फळ देत असते.