मराठी संदेश: प्रेम म्हंजे..!
प्रेम म्हणजे प्रेम असतं..., फक्त सांगणं जरुरी असतं! प्रेमाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

प्रेम म्हंजे..!
नातं

हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान-अपमान नात्यात काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्याच्या मनात राहता आलं पाहिजे!

प्रेम म्हंजे..!
सुख

वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा, भविष्य फार धुर्त आहे.. ते फक्त आश्वासन देतं, खात्री नाही!

प्रेम म्हंजे..!
सौंदर्य

माणुस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे. कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते. पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते...!!