मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
आयुष्य हे

तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही. तसचं, आयुष्याचे आहे. सुख दु:खाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही.

सुप्रभात
नाती

कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटंसुदधा निसटुन जातात.
कारण नाती ताकदीने नाही, मनाने निभवायची असतात!

सुप्रभात
स्वप्नं

हृदयाचा प्रत्येक ठोका हा स्वप्नं पूर्ण करण्याची प्रेरणा देत असतो!