मराठी संदेश: सुप्रभात
सुप्रभात! शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

सुप्रभात
मन

मन प्रसन्न असो वा नसो पण चेहरा नेहमीच हसरा असावा. कारण दुनिया चेहरा पहाते मन नाही.

सुप्रभात
नाती

अक्षरांच्या ओळीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात रहातात आणि वाचली तर अधिक समजतात!

सुप्रभात
मन आणि शरीर

शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं.