मराठी संदेश: शुभ रात्री
शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री

माणूस

माणसाला कावळ्यात "बाप" दिसतो,
गाईमध्ये "माय" दिसते,
दगडात "देव" दिसतो,
तर मग माणसांत "माणूस" का बरं दिसत नाही?

शुभ रात्री

समाधान

माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परंतू तो जे शोधतो ते कधीचं भेटत नसतं आणि ते शोधण्यातचं त्याचं पूर्ण आयुष्य संपतं, ते म्हणजे समाधान!

शुभ रात्री

सत्य आणि असत्य

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण असत्य हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते!

शुभ रात्री

कर्म

हार कधी मानु नका, यश तुमच्याजवळ आहे! कर्मावर आणि प्रामाणिकपणावर नि:संकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतके देणार, की मागायला काहीच उरणार नाही!

×

मराठी ग्रीटिंग © हक्क राखीव: २०१० - २०२०