मराठी संदेश: शुभ रात्री
शभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

शुभ रात्री
खरी मजा

पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते!

शुभ रात्री
आधार

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो!

शुभ रात्री
भविष्य

आकाशातील ग्रह व तारे हे जर माझे भविष्य ठरवित असतील.
"तर माझ्या मनगट आणि मेंदूचा काय उपयोग?"
- स्वामी विवेकानंद