मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
आपली माणसं

"काय चुकलं" हे शोधायला हवं,
पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.
आपली माणसं मोठी करा,
आपोआप आपणही मोठे होऊ!

सामाजिक
आनंद

जगण्याचा आनंद हा आपल्या अवती भवतीच असतो,
फक्त त्याला शोधता आलं पाहिजे!

सामाजिक
आनंद

जी माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात, त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही!