मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
आठवण

तुम्हांला आठवण येत नाही आणि
आम्ही विसरू शकत नाही!
तुमचं आमचं नातं एवढं मस्त आहे की,
तुम्ही विचारू शकत नाही आणि
आम्ही सांगू शकत नाही!

सामाजिक
आयुष्य

निशिगंधा सारखं सुगंधित होत जावं,
आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावं!
अश्रु असोत कुणाचेही,
आपणच विरघळुन जावं!
नसोत कुणीही आपलं,
आपण मात्र सर्वांचं व्हावं!!

सामाजिक
संग्रह

माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.