मराठी संदेश: सामाजिक
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग/ शुभेच्छापत्रे

सामाजिक
प्रगती

उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते.
प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते.

सामाजिक
माणसं

काही माणसं ही पिंपळाच्या पानासारखी असतात.
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.

सामाजिक
अभाव.. भाव आणि स्वभाव

काहीच नसतं तेंव्हा "अभाव" नडतो,
थोडंसं असतं तेंव्हा "भाव" नडतो आणि
सगळंच असतं तेंव्हा "स्वभाव" नडतो.