मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
जगण्यासाठी

आयुष्यात जगण्यासाठी तीनच गोष्टींची गरज असते.
हवा,
पाणी आणि..
डोक्याचे स्क्रू ढील्ले असलेले एक दोन मित्र!

स्टेटस
आयुष्य

निशिगंधा सारखं सुगंधित होत जावं,
आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुलत जावं!
अश्रु असोत कुणाचेही,
आपणच विरघळुन जावं!
नसोत कुणीही आपलं,
आपण मात्र सर्वांचं व्हावं!!

स्टेटस
संग्रह

माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.