मराठी संदेश: स्टेटस
मी माझा.. माझं स्टेटस... मराठी संदेश आणि मराठी ग्रिटिंग / शुभेच्छापत्रे

स्टेटस
इमानदारी

निवडलेला रस्ताच जर इमानदारीचा व सुंदर असेल,
तर थकुन जाण्याचा प्रश्नच उरत नाही.
मग भले सोबत कुणी असो वा नसो!

स्टेटस
जगा

श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान.
झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान!
आयुष्य म्हणजे,
शोधला तर अर्थ आहे,
नाहीतर नुसता स्वार्थ आहे!

स्टेटस
सांभाळा

खुप दूरवर पहाण्याच्या नादात,
चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात.
त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा,
मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं!