Marathi Greetings!Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...
वर्गः: मातृदिन, शुभेच्छापत्रे
मे महिन्याचा दुसरा रविवार हा भारतामध्ये मातृदिन म्हणुन साजरा केला जातो.
आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळतेवात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येतेआई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतेंहांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येतेसुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतेंनको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातेंकवी – बाळ कोल्हटकर