Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

प्रासंगिक

आपल्या मोबाईल वरुन एसएमएस किंवा ई-मेल द्वारा पाठवण्यासाठी प्रासंगिक शुभसंदेश.

माफ करा [Marathi Sorry Quotes - Sorry Messages]

वर्गः: , ,

ये सायबा,
आपुन चुकलो रे.. एक डाव माफी कर!

अजानतेपणी मी आपल्याला दुखावलं. मी माझी चुक मान्य करतो.
आपण माझी चुक माफ कराल हीच अपेक्षा!

चुकलो मी… आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का?
… चल .. मी तुझी जाहीर माफी मागतो.. आता तरी बोल!

खरं सांगायचं तर, माझंच चुकलं! मी माझी चुक मान्य करतो.
मला माफ कराल ना?

अहो, मी पण माणुसच आहे – चुकतो कधी – कधी!
तुम्ही मोठेपण दाखवुन मला माफ करा ना!

मी मोठ्ठा गाढवपणा केला, मान्य करतो!
माफी असावी!

हात् तिच्या! बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो!
आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस. किमान हे वाचुन तरी मला माफ कर!

झालं गेलं गंगेला मिळालं, आमचं घोडं गंगेत नहालं!
खरं सांगायचं तर, माझंच चुकलं! मला माफ कराल ना?

अगदी “सॉरी शक्तिमान” ही म्हणालो… आता तरी माफ कर!


मैत्रीचे संदेश [Friendship Day - Marathi Messages - Quotes]

मैत्रीचा दिवस शुभेच्छापत्र पाठवताना सोबत मैत्रीचा दिवस संदेश लिहिण्यासाठी मैत्रीचा संदेश असणार्‍या पानावरुन आपला मैत्रीचा संदेश कॉपी करा.

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!

तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

रोजच आठवण यावी, असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे, असेही काही नाही ..।
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी याला खात्री म्हणतात..
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे याला मैत्री म्हणतात …॥
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..
नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ,काही खरखरीत..
काही काळी,काही पांढरी..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..
त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी….
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण!
हा धागा नीट नपायचा असतो,
तो कधीच विसरायचा नसतो!
कारण ही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटुन जातात
जशी बोटावर रंग ठेवुन
फुलपाखरं हातून सुटुन जातात!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मित्र केवळ अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत!
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील
पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र
दैवानेच लाभतात! – व. पु. काळे!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मित्रा, आपल्या मैत्राचा मला अभिमान आहे!
आपली ही मैत्री वर्षानुवर्षे अशीच वाढत राहो, हीच सदिच्छा!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मराठी भाषा दिवस – संदेश [Marathi Bhasha Diwas- Marathi Messages]

वर्गः: , ,

माझी मराठीची बोलु कौतुके।
परि अमृताते ही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥
-श्री संत ज्ञानेश्वर.

वेडात मराठे वीर दौडले सात…
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील”
माघारी वळणे नाही मराठी शील
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
विसरला महाशय काय लावता जात
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
-कवी कुसुमाग्रज

रुजवू मराठी,
फ़ुलवू मराठी,
चला बोलु मराठी!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी
- सुरेश भट

जैसी पुस्पांमाजि पुष्प मोगरी |
की परिमळांमाजि कस्तुरी |
तैसी भासांमाजि साजिरी | मराठिया ||

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
- सुरेश भट


एकुण पाने:»

 

Write Us
Google Plus
Subcribe to Marathi Greetings RSS Feed