Marathi Greetings!

Free Marathi Greetings, Messages, Ringtones, Wallpapers and Graphics...

मराठी भाषा दिवस संदेश

प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी जगभरातले मराठी भाषिक लोक ‘मराठी भाषा दिवस’ साजरा करतात.

मराठी भाषा दिवस – संदेश [Marathi Bhasha Diwas- Marathi Messages]

वर्गः: , ,

माझी मराठीची बोलु कौतुके।
परि अमृताते ही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥
-श्री संत ज्ञानेश्वर.

वेडात मराठे वीर दौडले सात…
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील”
माघारी वळणे नाही मराठी शील
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥
विसरला महाशय काय लावता जात
“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥
-कवी कुसुमाग्रज

रुजवू मराठी,
फ़ुलवू मराठी,
चला बोलु मराठी!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी
- सुरेश भट

जैसी पुस्पांमाजि पुष्प मोगरी |
की परिमळांमाजि कस्तुरी |
तैसी भासांमाजि साजिरी | मराठिया ||

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
- सुरेश भट



 

Write Us
Google Plus
Subcribe to Marathi Greetings RSS Feed